Police bharti question paper in marathi
1.चितगाव कट, काकोरी कट, मीरत कट व तत्कालीन अन्य क्रांतिकारक कारवायांमध्ये सहभागी असलेल्या सशस्त्र भारतीय क्रांतिकारकांवर.
1 फ्रेंच
2. रशियन**
3. मेईजी
4. चिनी
2.सौदी अरेबिया देशाचे नवीन पंतप्रधान म्हणून
कोणाची निवड झाली आहे.
1. मोहम्मद बिन सलमान**
2. हसन अखूंद
3. सलमान बिन अजीज
4. यापैकी नाही
3. लता दीनानाथ मंगेशकर या पुरस्काराने
कोणाला सन्मानित करण्यात येणार आहे
1. शैलेंद्र सिंग
2. आनंद मिलिंद
3. कुमार सानू
4. यापैकी सर्व**
4. राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांची व
इतर सदस्यांची नेमणूक करण्याचे अधिकार
कोणास आहेत ?
1. राष्ट्रपतीस
2. संसदेस
3. राज्यपालास**
4. विधानसभेस
5.घटनेच्या कितव्या कलमानुसार संसद आणीबाणीच्या काळात राज्य सूचीतील विषयांसंबंधी कायदे करू शकते ?
1. २६३
2. २४९
3. २४८
4. २५०**
6.सातव्या परिशिष्टातील तीनही सूचींमध्ये दिलेल्या विषयां व्यतिरिक्त उर्वरित विषयांवर कायदे करण्याचे अधिकार कोणास आहेत ?
1. संसदेस**
2. संबंधित घटक राज्यास
3. संसदेस व घटक राज्यास
4. यांपैकी कोणासही नाहीत
Police bharti question paper in marathi
7.भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तास वयाची किती वर्षे पूर्ण होईतो अधिकारावर राहता येते ?
1. ५८
2. ६०
3. ६२
4. ६५**
8. खालीलपैकी कोणत्या गृहाचा अध्यक्ष हा
त्या गृहाचा सदस्य नसतो ?
1. लोकसभा
2. राज्यसभा**
3. विधानसभा
4. विधानपरिषद
9. खालीलपैकी कोणत्या गृहाचा अध्यक्ष हा
त्या गृहाचा सदस्य नसतो ?
1. लोकसभा
2. राज्यसभा**
3. विधानसभा
4. विधानपरिषद
10. भारतीय राज्यघटनेमध्ये दुरुस्ती करण्याच्या प्रक्रियेची सुरुवात खालीलपैकी कोण करते ?
(१) लोकसभा (२) राज्यसभा (३) पंतप्रधान
(४) राष्ट्रपती (५) कायदा मंत्री
1. १ आणि २**
2. १ आणि ४
3. १, २, आणि ४
4. १, २, ४ आणि ५
11. भारतीय घटनेचा सर्वाधिक भाग हा ….
च्या भारत सरकारच्या कायद्यानुसार घेण्यात
आलेला आहे.
1. १९०९
2. १९३५**
3. १९१९
4. १९४५
12. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश ………..
वर्षे वय पूर्ण होईपर्यंत पदावर राहू शकतात.
1. ६५**
2. ६२
3. ६७
4. ५८
13.IIFL वेल्थ हुरुन इंडिया रिच लिस्ट 2022
नुसार, यादीत कोण अव्वल आहे?
A. अनिल अंबानी
B. जेफ बेझोस
C. मुकेश अंबानी
D. गौतम अदानी**
14.कोणत्या मंत्रालयाने ‘स्वच्छ टॉयकॅथॉन’
ही स्पर्धा सुरू केली?
A. गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय**
B. अर्थ मंत्रालय
C. IT आणि दूरसंचार मंत्रालय
D. गृह मंत्रालय
15.चंद्राला पृथ्वीभोवती एक फेरी पूर्ण करण्यास दिवस…. लागतात.
1. २९.५
2. ३०.५
3. २८.३३
4. २७.३३**
16. धातूंबरोबरच्या पाऱ्याच्या संयुगांना …………….
अशी संज्ञा आहे.
1. अॅलट्रॉपी
2. अमालगम**
3. पॅरामिन्स
4. अमोनोलिसिस
17.पुढीलपैकी कोणते एक अत्यंत अस्थिर स्वरूपाचे आणि शिजविताना व साठवल्यामुळे नष्ट होणारे जीवनसत्त्व आहे ?
1. ‘अ’ जीवनसत्त्व
2. ‘क’ जीवनसत्त्व**
3. ‘बी ६’ जीवनसत्त्व
4. ‘के’ जीवनसत्त्व
18.खालीलपैकी कोणता पदार्थ झाडापासून
मिळविला जातो ?
1. टाकणखार
2. शिलाजीत
3. कापुर**
4. शेंदूर
19.खालीलपैकी कोणत्या वायूचे श्वसित व
उच्छ्वसित हवेतील प्रमाण बदलत नाही ?
1. कार्बन-डाय-ऑक्साइड
2. नायट्रोजन**
3. ऑक्सिजन
4. यांपेक्षा वेगळे उत्तर.
20. घड्याळामधील काटे चकाकण्यासाठी खालीलपैकी कशाचा उपयोग करतात
1.सिल्व्हर ब्रोमाइड
2. टॅफ्लीन
3. फॉस्फरस**
4. कोबाल्ट
21.खालीलपैकी ……… चा धागा इतर तिन्हींच्या
धाग्यांपेक्षा कमी ज्वालाग्राही आहे.
1. कापूस
2. रेशीम**
3. नायलॉन
4. रेऑन
22.खालीलपैकी कोणत्या वायूचे श्वसित व
उच्छ्वसित हवेतील प्रमाण बदलत नाही ?
1. कार्बन-डाय-ऑक्साइड
2. नायट्रोजन**
3. ऑक्सिजन
4. यांपेक्षा वेगळे उत्तर.
23.घड्याळामधील काटे चकाकण्यासाठी
खालीलपैकी कशाचा उपयोग करतात ?
1. सिल्व्हर ब्रोमाइड
2. टॅफ्लीन
3. फॉस्फरस**
4. कोबाल्ट
24.शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे.
चा -हास होतो.
1. कॅल्शिअम क्लोराइड**
2. मॅग्नेशिअम क्लोराइड
3. सोडिअम क्लोराइड
4. पोटॅशिअम नायट्रेट
25.खालीलपैकी ………. वगळता इतर तिन्ही
इंद्रिये शरीरात डाव्या व उजव्या दोन्ही बाजूंस
असतात.
1. फुप्फुस
2. डोळे
3. मूत्रपिंड
4. पांथरी**
26.डोळ्यातील दृक्पटल (Retina) ची तुलना
कॅमेऱ्यातील ……… शी करता येईल.
1. भिंग
2. फिल्म**
3. ब्रोमाइड
4. काच
27.छातीच्या पिंजऱ्यातील बरगड्यांच्या बारा जोड्यांपैकी वरच्या ………. जोड्या छातीच्या हाडाला जोडलेल्या असतात.
1. तीन
2. पाच
3. सात**
4. नऊ
28. कोणत्या राज्याच्या तुरुंग विभागाने प्रिझन स्टाफ अटेंडन्स ऍप मोबाईल ऍप्लिकेशन सुरू केले आहे?
A. आसाम
B. नागालँड**
C. मणिपूर
D. मेघालय
29.महिला आशिया चषक 2022 चे आयोजन कोणता देश करेल?
A. भारत
B. बांगलादेश**
C. युनायटेड किंगडम
D. ऑस्ट्रेलिया
30. ‘व्हेसुव्हीअस’ हा प्रसिद्ध ज्वालामुखी
खालीलपैकी कोणत्या देशात आहे ?
1. जपान
2. सिसिली
3. इंडोनेशिया
4. इटली**
31.’मरियाना गर्ता’ ही जगातील सर्वांत मोठी गर्ता खालील पैकी कोणत्या महासागरात आहे?
1.पॅसिफिक**
2. अटलांटिक
3. हिंदी
4.आर्क्टिक
32.ज्या ज्वालामुखीचा उद्रेक होणे आता पूर्णत: व कायमचे थांबले आहे; अशा ज्वालामुखीस ‘मृत ज्वालामुखी’ संबोधिले जाते. खालीलपैकी कोणता ज्वालामुखी ‘मृत ज्वालामुखी’ या प्रकारात मोडतो ?
1. क्रकाताऊ (इंडोनेशिया)
2. स्ट्रॉबोली (इटली)
3. माऊंट पोपा (म्यानमार)**
4. फुजियामा (जपान)
33. जो ज्वालामुखी सध्या शांत आहे; पण त्याचा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशा ज्वालामुखीस ‘निद्रिस्त ज्वालामुखी’ असे म्हणता येईल. खालीलपैकी कोणता ज्वालामुखी हा निद्रिस्त ज्वालामुखी म्हणून सांगता येईल ?
1.स्ट्रॉबोली (इटली)
2.माऊंट एटना (सिसिली)
3. माऊंट पोपा (म्यानमार)
4. फुजियामा (जपान)**
34.मनोज नरवणे हे कितवे लष्करप्रमुख होते ?
1. 26 वे
2. 27 वे
3. 28 वे**
4. 29 वे
35.ज्या ज्वालामुखीचा उद्रेक वारंवार होत असतो त्यास ‘जागृत ज्वालामुखी’ असे म्हणतात. खालीलपैकी कोणत्या ज्वालामुखीची गणना ‘जागृत ज्वालामुखी’ या
प्रकारात करता येणार नाही ?
1. स्ट्रॉबोली (इटली)
2. माऊंट एटना (सिसिली)
3. क्रकाताऊ (इंडोनेशिया)
4. फुजियामा (जपान)**
36. महाराष्ट्रातील ……….. हा अग्निजन्य खडकाचा प्रकार होय.
1. नीस
2. बेसॉल्ट**
3. ग्रॅनाईट
4. पातालिक
37.खालीलपैकी कोणते विधान चुकीचे
आहे ?
1. ज्या वेळी पृथ्वी, चंद्र व सूर्य यांच्या मध्ये येते
त्या वेळी चंद्रग्रहण लागते.
2. ज्या वेळी चंद्र; सूर्य व पृथ्वी यांच्या मध्ये येतो
त्या वेळी सूर्यग्रहण लागते.
3. चंद्रग्रहण नेहमी पौर्णिमेस येते, तर सूर्यग्रहण
नेहमी अमावस्येस येते.
4.प्रत्येक पौर्णिमेस चंद्रग्रहण लागते, तर प्रत्येक
अमावस्येस सूर्यग्रहण लागते.**
38.ग्रीनिच येथे दुपारचा एक वाजला असता भारतीय प्रमाणवेळेनुसार भारतात किती वाजलेले असतील?
1. सकाळचे साडेसात
2. सकाळचे साडेआठ
3. सायंकाळचे साडेपाच
4. सायंकाळचे साडेसहा**
39भारतीय प्रमाणवेळ ही ८२.५° पूर्व रेखावृत्ताच्या स्थानिक वेळेवरून निश्चित केली आहे. वरील रेखावृत्त खालीलपैकी कोणत्या दोन शहरांच्या दरम्यान आहे ?
1. प्रयागराज व दिल्ली
2. हैदराबाद व सिकंदराबाद
3. प्रयागराज व वाराणसी**
4. दिल्ली व आग्रा
40.पृथ्वीचा किती टक्के भूभाग हा पाण्याने
व्यापलेला आहे ?
1. ५० टक्के
2. ७१ टक्के**
3. २५ टक्के
4. ७५ टक्के
41.हिमाचल प्रदेश विधानसभेत एकूण किती
जागा आहेत?
1. 68**
2. 65
3. 70
4. 72
42.2022 चा टाटा लीट्रेचर जीवनगौरव पुरस्कार
कोणाला देण्यात आला?
1. नाय पॉल
2. महास्वेता देवी
3. महेश एलकुंचवार**
4. रसकीन बोंड
43.’पाकिस्तान’ हा शब्द सर्वप्रथम सन १९३३
मध्ये ‘नाऊ और नेव्हर’ या पुस्तकात वापरला
गेला, है पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले
होते?
1. डॉ. महंमद इक्बाल
2. बॅ. महंमदअली जीना
3. रहमत खान**
4. सर सय्यद अहमदखान
44.ब्रिटिशांचा जुलूम, राष्ट्रीय आंदोलन व एकूण तत्कालीन राजकीय परिस्थिती रूपकात्मक पद्धतीने प्रतिबिंबित करणारे ‘कीचकवध’ हे नाटक……… यांनी लिहिले आहे.
1. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर
2. कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर**
3. मामासाहेब वरेरकर
4. दादासाहेब खापर्डे
45.सन १९१९ मध्ये लोकमान्य टिळकांनी राष्ट्रीय असंतोष प्रकट करण्यासाठी ……… या नव्या मार्गाची घोषणा केली.
1. असहकार
2. बहिष्कार
3. सत्याग्रह
4. प्रतियोगिता सहकार**
46.जालियनवाला बाग, अमृतसर येथे निरपराध लोकांना अमानुष गोळीबार करणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव …………
1. जनरल डायर**
2. ले. गव्हर्नर ओडवायर
3. कमिशनर रँड
4. ले. गव्हर्नर फुल्लर
47.मंडालेच्या तुरुंगात असताना लोकमान्य
टिळकांनी ………… हा ग्रंथ लिहिला.
1. आर्क्टिक होम इन दी वेदाज
2. गीतारहस्य**
3. ओरायन
4. प्रतियोगिता सहकार
48. माँटेग्यू-चेम्सफर्ड सुधारणा जाहीर झाल्यावर लोकमान्य टिळकांनी केसरीत कोणता लेख लिहिला ?
1. जनाब दिल्ली तो बहुत दूर है।**
2. सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?
3. चलो दिल्ली
4. वरीलपैकी कोणताच नाही.
49.मंडालेच्या तुरुंगात असताना लोकमान्य
टिळकांनी ……….. हा ग्रंथ लिहिला.
1. आर्क्टिक होम इन दी वेदाज
2. गीतारहस्य**
3. ओरायन
4. प्रतियोगिता सहकार
50.इ.स. १९०८ मध्ये ज्या न्यायमूर्तींनी टिळकांना राजद्रोहाच्या आरोपाखाली सहा वर्षांची काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावली तेच टिळकांवरील १८९७ च्या खटल्यात त्यांचे वकील होते. त्यांचे नाव ……….
1. दावर**
2. मॅथ्यू
3. ग्रोवर
4. जॅक्सन
51.“पन्नास वर्षे ! ब्रिटिश राज्य तोवर टिकेल
तर ना?” हे उद्गार खालीलपैकी कोणाचे
आहेत ?
1. बाबाराव सावरकर
2. स्वातंत्र्यवीर सावरकर**
3. लोकमान्य टिळक
4. महात्मा गांधी
52. अलीकडेच कोणत्या देशाने किगाली
दुरुस्तीला मान्यता दिली?
A. भारत
B. यूएसए**
C. UK
D. रशिया
53.देशातील पहिल्या ‘तृतीयपंथी शासकीय
शिक्षिका होण्याचा मान कोणाला मिळाला
आहे?
1. रिया आवळेकर**
2. मीना कुमारी
3. आरोही कणसे
4. प्रीतम राजन
54.राज्यसभेचे अध्यक्ष ……….. पेक्षा अधिक संख्या नसलेल्या उपाध्यक्षांच्या पॅनेलचे नामांकन करतात.
1. दोन
2. पाच
3. चार
4. सहा**
55.राज्यांच्या विधानसभेत जास्तीत जास्त ……….इतके सभासद असू शकतात.
1. ५००**
2. ६०
3. २५०
4. ५४५
56. प्रतिबंधात्मक स्थानबद्धता कायद्यानुसार (Preven tive Detention Act) एखाद्या व्यक्तीस जास्तीत जास्त…. इतका काळ स्थानबद्ध करता येते.
1. तीन महिने**
2. एक वर्ष
3. सहा महिने
4. दोन वर्षे
57. ‘संघराज्य शासनपद्धतीमध्ये …………..
1. केंद्र व राज्ये यांमध्ये अधिकारांची विभागणी केलेली असते.
2. केंद्र शासनाकडून राज्य शासनास अधिकार प्रदान केले जातात.
3. केंद्राकडे अधिकार एकवटलेले असतात,
4. केंद्र व राज्ये यांना समान अधिकार असतात.
58.खालीलपैकी कोणता कर राज्य सरकार
वसूल करू शकत नाही ?
1. विक्रीकर
2.जमीन व इमारतीवरील कर
3. शेतकी उत्पन्नावरील कर
4. कॉर्पोरेशन टॅक्स**
59.खालीलपैकी कोणते प्रकरण (Case) घटनादुरुस्तीशी संबंधित नाही ?
1. गोलकनाथ विरुद्ध पंजाब सरकार,
2. स्वामी केशवानंद भारती विरुद्ध भारत
सरकार.
3. मिनर्व्हा मिल्स लिमिटेड विरुद्ध भारत
सरकार,
4. वरील सर्व प्रकरणे घटनादुरुस्तीशी संबंधित
आहेत.**
60.खालीलपैकी कोणता कर केंद्र शासनाच्या
उत्पन्नाचे एक साधन आहे ?
1. आयकर**
2. शेतसारा
3. व्यवसायकर
4. वाहनकर
61.खालीलपैकी कोणती बाब राज्य
शासनाच्या उत्पन्नाचे एक साधन आहे?
1. शेतजमिनीवरील वारसाकर**
2. रेल्वेचे उत्पन्न
3. कस्टम ड्यूटी
4. पोस्ट खात्याचे उत्पन्न
62.खालीलपैकी कोणती भाषा घटनेच्या आठव्या परिशिष्टात समाविष्ट नाही ?
1. उर्दू
2. सिंधी
3. मणिपुरी
4. नागा**
63. अध्यक्षीय राज्यपद्धतीत मंत्रिमंडळ……..
जबाबदार असते.
1. लोक्सप्रेस
2. राज्यसभेस
3. प्रत्यक्षपणे मतदारांना
4. अध्यक्षांना**
64.कोणते स्वदेशी डायव्हिंग सपोर्ट व्हेसल्स
नुकतेच लॉन्च केले गेले आहेत?
A. INS निस्टार**
B. INS तिरंगा
C. INS नेहा
D. INS विराट
65.खालीलपैकी कोणत्या धातूंवर पाण्याची
अभिक्रिया होत नाही ?
1. जस्त व शिसे
2. शिसे व पारा
3. पारा व जस्त
4. तांबे व चांदी**
66.माणसाच्या स्नायूंमध्ये जवळजवळ ……….
टक्के इतके पाणी असते.
1. ३५
2. ५०
3. ६५**
4. ८५
67. माणसाच्या शरीरातील माकडहाड हे …………….
मणक्यांचे मिळून बनलेले असते.
1. तीन
2. चार**
3. पाच
4. सात
68.केंद्रीय लोकसेवा आयोगाचे नवीन अध्यक्ष
कोण आहेत ?
1. मनोज सोनी**
2. प्रदीपकुमार जोशी
3. सुशील कुमार
4. यापैकी नाही
69.रंगहीन, हवेपेक्षा जड व उग्र वास असलेला
वायू कोणता?
1. हायड्रोजन
2. ओझोन
3. कार्बन १-डाय-ऑक्साइड**
4. नायट्रोजन
70. खालीलपैकी पाण्यात द्रावणीय असणारा,
आम्लधर्मीय व ज्वलनविरोधक असा वायू
कोणता ?
1. कार्बन-डाय- ऑक्साइड**
2. नायट्रोजन
3. ओझोन
4. हायड्रोजन
71.खाली तीन वायुरूप इंधनांची नावे दिली
आहेत. चौथे नाव त्यापेक्षा वेगळे आहे, ते
कोणते ?
1. मिथेन
2. ब्युटेन
3. प्रोपेन
4. पॅराफिन**
72.खालीलपैकी कशास काळे सोने’ म्हणून
संबोधले जाते ?
1. पेट्रोलिअम**
2. चहा
3. कसदार माती
4. दगडी कोळसा
73.ज्या धातूंचे तापविल्यानंतरही ऑक्सिडीकरण होत नाही, असे तीन धातू खाली नमूद केले आहेत. चौथ्या धातूत हे वैशिष्ट्य आढळत नाही तो ओळखा.
1. सोने
2. क्रोमिअम**
3. चांदी
4. प्लॅटिनम
74. इंटरनेट हा मूलभूत अधिकार देणारे
भारतातील पहिले राज्य कोणते?
1. महाराष्ट्र
2. गोवा
3. केरळ**
4. गुजरात
75.खालीलपैकी कोणी नुकताच PIB चा
महासंचालक पदाचा करभार स्वीकारला
आहे?
1. संजय अरोरा
2. सत्येंद्र प्रकाश**
3. प्रणय कुमार वर्मा
4. इंदरमित गील
76. पृथ्वीवर एकाच वेळी काही भागांत दिवस
तर काही भागांत रात्र असते. या बाबीचा
कार्यकारणसंबंध खालीलपैकी कशाशी
जोडता येईल ?
1. पृथ्वीचे परिभ्रमण
2. पृथ्वीची गोलाई
3. पृथ्वीची वार्षिक गती
4. पृथ्वीचे परिवलन**
77. आपणास चंद्रप्रकाश आल्हाददायक किंवा
सौम्य वाटतो; कारण ………..
1. चंद्राला पृथ्वीवरून परावर्तित होणारा प्रकाश
मिळतो.
2. सूर्यापासून मिळणाऱ्या एकूण प्रकाशाच्या
फक्त सात टक्केच प्रकाश चंद्राकडून परावर्तित केला जातो.**
3. चंद्र हा स्वयंप्रकाशी नसून त्याला सूर्यापासून
प्रकाश मिळतो.
4.चंद्रावरून पृथ्वीपर्यंत येताना चंद्रप्रकाशाची
तीव्रता कर्मी होते.
78………. नावाच्या सागराचा तळ उचलला
गेल्याने हिमालय व आल्प्स हे घडीचे पर्वत
तयार झाले.
1. टेथिस**
2. लॉरेशिया
3. कॅस्पियन
4. आर्क्टिक
79.खालीलपैकी कोणते खंडांतर्गत समुद्राचे
उदाहरण सांगता येईल?
1. अरबी समुद्र
2. चिल्का सरोवर
3. कॅस्पिअन सी**
4. बंगालचा उपसागर
80.’सिलिका’ व ‘मॅग्नेशिअम’ या मूलद्रव्यांपासून बनलेल्या भू-कवचाच्या खालच्या थरास असलेली विशिष्ट संज्ञा ………..
1. सायमा**
2. निफे
3. सियाल
4. नीस
81.भारताने नुकतीच चाचणी केलेल्या अग्नी-4′ म्हणजे काय?
(A) इंटरमीडिएट रेंज बॅलिस्टिक मिसाइल**
(B) नेक्स्ट-जनरेशन कॉर्केट (NGC)
(C) पाणबुडीविरोधी क्षेपणास्त्र
(D) आंतरखंडीय क्षेपणास्त्र
82.कोणत्या संस्थेने ‘गुड फॉर यू, गुड फॉर
द प्लॅनेट’ मोहीम सुरू केली ?
(A) UNEP
(B) WWF**
(C) IMF
(D) IEA
83.खालीलपैकी कोणत्या शहरात उन्हाळ्यात
ख्रिसमस साजरा केला जातो ?
1. सिडनी**
2. बेथलहेम
3. बैरूत
4. न्यूयॉर्क
84. सूर्यकिरणांना सूर्यापासून पृथ्वीपर्यंत
येण्यास किती वेळ लागतो ?
1. ८ मिनिटे ३० सेकंद
2. ८ मिनिटे ५० सेकंद
3. ७ मिनिटे ४० सेकंद
4. ८ मिनिटे २० सेकं
85.दिवस व रात्र यांचे अखंड चक्र पृथ्वीच्या ……… मुळे चालू राहते.
1. परिभ्रमण
2. परिवलन**
3. प्रत्यावर्तन
4. केंद्रोत्सारी प्रेरणा
86. पृथ्वीवर वातावरण नसते तर पृथ्वीवरील
अवकाश रंगाचे दिसले असते.
1. पांढऱ्या
2. निळ्या
3. काळ्या**
4. तांबड्या
87. पुढे दिलेल्या वर्णनावरून वनांचा प्रकार ओळखा. काही झाडे फुललेली, काहींना फळे धरलेली, त्याच वेळी काहींची पानगळ चालू आहे. ऋतूप्रमाणे बदलते हवामान येथे नाही.
1. सूचिपर्णी
2. भूमध्य सागरी
3. उष्ण कटिबंधीय मोसमी**
4. समशीतोष्ण सदाहरित
88.आकाशातून पाहिले असता पृथ्वी निळ्या
रंगाची दिसते; कारण ………
1.पृथ्वी निळसर रंगाची आहे.
2. पृथ्वीचा २९ टक्के भू-भाग भू-खंडांनी
व्यापलेला आहे.
3. पृथ्वीचा ७१ टक्के भू-भाग जलव्याप्त आहे.**
4. पृथ्वीभोवती निळ्या रंगाचे वातावरण आहे.
89.चंद्रावरील गुरुत्वाकर्षण पृथ्वीवरील
गुरुत्वाकर्षणाच्या ……..असते.
1. दुप्पट
2. एक-पंचमांश
3. एक – षष्ठांश**
4. एक-तृतीयांश
90. ‘प्यूर्टोरिको’ आणि ‘रोमांश’ या गर्ता
खालीलपैकी कोणत्या महासागरात आहेत ?
1.हिंदी
2.अटलांटिक**
3.पॅसिफिक
4.आर्क्टिक
91.खालीलपैकी कोणती गर्ता पॅसिफिक
महासागरात नाही ?
1.साऊथ सँडविच**
2. जपानी गर्ता
3. टोंगा गर्ता
4. अॅल्युशियन गर्ता
92. मातीची धूप टाळून ती जतन करण्यासाठी
योजल्या जाणाऱ्या पुढील उपायांपैकी
कोणता उपाय भारतासाठी उपयुक्त आहे ?
(१) पिकांचा फेरपालट (२) वाळूचे कुंपण
(३) टेरासिंग (४) वारा अडवणे
1. १, २ व ३
2. १, ३ व ४**
3. २ व १
4. १ ते ४ सर्व
93.एल रूट सर्व्हर (L-root server) मिळवणारे देशातील पहिले राज्य खालीलपैकी कोणते ठरले आहे ?
1. मध्यप्रदेश
2. राजस्थान**
3. महाराष्ट्र
4. पश्चिम बंगाल
94.भारताने सर्वात वजनदार असणाऱ्या
या रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण केले ?
1. LAMV 3
2. LVM 3**
3. MVL – 3
4. ILM – 3
95. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म …. येथे
झाला.
1. रत्नागिरीजवळ चिखली
2. दापोलीजवळ आंबावडे
3. इंदूरजवळ महू**
4. मराठवाड्यात औरंगाबाद
96.यांनी मुंबई येथे परदेशी मालाच्या मोटारींसमोर सत्याग्रह करून आत्मबलिदान केले.
1. श्रीकृष्ण सारडा
2. विष्णू गणेश पिंगळे
3. बाबू गेनू**
4.वासुदेव गोगटे
97. ‘चौरीचौरा येथील हिंसाचाराची घटना
खालीलपैकी वर्षी घडली ?
1. १९१९
2. १९२२**
3. १९२६
4. १९३०
98.’इन्किलाब झिंदाबाद’ या घोषणेचे व ‘ये
हिंदोस्ताँ हमारा’ या कवितेचे जनक ………….. यांनीच मुस्लिमांच्या स्वतंत्र राष्ट्राची कल्पना सर्वप्रथम मांडली.
1. मिर्झा गालीब
2. डॉ. महंमद इक्बाल**
3. लियाकतअली
4. बॅ. महंमदअली जीना
99.खालीलपैकी कोणास आपण ‘मुस्लीम
लीग’चे संस्थापक म्हणून ओळखतो ?
1. बॅ. महंमदअली जीना
2. आगाखान
3. सर सय्यद अहमदखान
4. नवाब सलिमुल्ला**
100.’अ नेशन इन दी मेकिंग’ या ग्रंथाचे कर्ते…. ….
1. व्योमेशचंद्र बॅनर्जी
2. अरविंद घोष
3. सुरेंद्रनाथ बॅनर्जी**
4. सुभाषचंद्र बोस
101.गो. कृ. गोखले यांनी राजकारणाच्या संदर्भात मांडलेला महत्त्वाचा विचार …
1. राजकारणाचे सार्वत्रिकीकरण
2. राजकारणाचे उच्चाटन
3. राजकारणाचे ध्रुवीकरण
4. राजकारणाचे आध्यात्मिकीकरण**
102. “जोपर्यंत या देशातील बहुसंख्य असलेला
शेतकरी वर्ग राष्ट्रीय सभेच्या बाहेर आहे
तोपर्यंत राष्ट्रीय सभेला स्वतःस राष्ट्रीय म्हणवून
घेण्याचा अधिकार नाही. ” या शब्दांत राष्ट्रीय
सभेच्या नेत्यांना ठणकावून सांगणारे कर्ते
समाजसुधारक व थोर विचारवंत म्हणजे.
1.गो. ग. आगरकर
2. महात्मा गांधी
3. महात्मा जोतीबा फुलें**
4. न्यायमूर्ती रानडे
103. हा महात्मा फुले यांचा ग्रंथ त्यांच्या मरणोत्तर म्हणजे १८९१ मध्ये प्रकाशित करण्यात आला.
………
1. ब्राह्मणांचे कसब**
2. सार्वजनिक सत्यधर्म
3. शेतकऱ्याचा असूड
4. इशारा
104.जोतीराव फुल्यांना ‘महात्मा’ ही पदवी
देण्यात कोणी पुढाकार घेतला होता?
1. डॉ. विश्राम घोले व कृष्णाजी भालेकर
2. रावबहादूर वडेकर व नारायणराव लोखंडे**
3. तुकाराम तात्या पडवळ व बाबा पद्मनजी
4. बाबा पद्मनजी व दयानंद सरस्वती
105.अज्जन एलायजा सॉलोमन हे ज्यूधर्मीय
गृहस्थ च्या व्यवस्थापक मंडळाचे सदस्य
होते.
1. सत्यशोधक समाज
2. प्रार्थना समाज**
3. ब्राह्मो समाज
4. डिप्रेस्ड क्लासेस मिशन
106)…… यांची ‘जालियनवाला बाग’ ही कविता
एके काळी अत्यंत गाजली होती
1. केशवसुत
2. गोविंदाग्रज
3. कुसुमाग्रज**
4. यशवंत
107. महात्मा गांधीजींचा जन्म रोजी
गुजरातमध्ये पोरबंदर येथे झाला.
1. २ ऑक्टोबर, १८६९**
2. ०२ ऑक्टोबर, १८७९
3. ३१ जानेवारी, १८६९
4. १९ नोव्हेंबर, १८६९
108. दक्षिण आफ्रिकेतील आपल्या वास्तव्यात
महात्माजी ……… हे वृत्तपत्र चालवीत.
1. इंडियन ओपिनियन**
2. दी सत्याग्रहा
3. इंडिया गॅझेट
4. ब्लॅक्स अँड व्हाइट्स
109.खालीलपैकी कोणती गुप्तचर संस्था ही
भारताची नाही ?
1. IB
2. RAW
3. CIA**
4. CBI
110.खालीलपैकी ‘स्पीड पोस्ट’ या पुस्तकाचे
लेखक कोण आहेत ?
1. शोभा डे**
2. अरुंधती राय
3. खुशवंत सिंग
4. मुल्क राज आनंद
111.(१) वास्तविक पाहता नीती आयोगाला
घटनात्मक स्थान नाही; परंतु
(२) प्रत्यक्ष व्यवहारात मात्र भारतीय
अर्थव्यवस्थेच्या संदर्भात नीती आयोगाला
अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.
1. दोन्ही विधाने चुकीची आहेत.
2. दोन्ही विधाने बरोबर आहेत.**
3. फक्त दुसरे विधान बरोबर आहे.
4. फक्त पहिले विधान बरोबर आहे.
See Video