या पोस्ट मदी आपण police patil bharti 2023 प्रश्न पाहणार आहोत
1.बुध्दीबळाचा सर्वात कमी वयाचा ग्रँड मास्टर
अभिमन्यू मिश्रा कोणत्या देशाचा आहे.
a. USA**
b. India
c. UK
d. Russia
2.US Air Qyality Index नुसार जगातील
सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीत दिल्लीचा
क्रमांक कितवा आहे ?
a. पहिला
b. दुसरा**
c. तिसरा
d. चौथा
3.खालील पैकी कोणत्या ठिकाणास विदर्भाचे नंदनवन असे म्हणतात?
a. मेळघाट
b. चिखलदरा**
c. ताडोबा
d. पेंच
4.वाऱ्याचा वेग मोजण्यासाठी खालीलपैकी कोणत्या उपकरणाचा वापर करतात
a. ऍनिमोमीटर**
b. सायनोमीटर
c. ऍक्टिनोमीटर
d. क्यायनोमीटर
5.खालीलपैकी कोणत्या ठिकाणी दैनिक
सरासरी तापमान कक्षा जास्त आहे
a. अलिबाग
b. पुणे
c. कोल्हापूर
d. नागपूर**
6.खालीलपैकी पर्जन्यविषयक कोणती प्रमुख समस्या महाराष्ट्राला भेडसावते ?
a. स्थलीय विविधता
b. कालीय विविधता
c. स्थल-कालीय विविधता**
d. यापैकी नाही
7.महाराष्ट्रात नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण किती आहे
a. 65%
b. 50%
c. 85%**
d. 100%
8.खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचा
पर्जन्यछायेच्या क्षेत्रात समावेश होतो ?
a. सांगली
b. अहमदनगर
c. सोलापूर
d. वरील सर्व**
9.महाराष्ट्रात सिंचन पद्धत फार मोठ्या प्रमाणात वापरली जाते?
a. ठिबक
b. मोकाट**
c. उपसा
d. तलाव
10.भारतामध्ये………मृदा मोठ्या प्रमाणात विखुरलेली आढळते?
a. काळी
b. तांबडी
c. जांभी
d. गाळाची**
11.महाराष्ट्राच्या पठारी विभागामध्ये…….. मृदा मोठ्या प्रमाणात विखुरलेली आढळते?
a. काळी**
b. गाळाची
c. तांबडी
d. जांभी
12.भारतातील सर्वच राज्यात मृदेची झीज होताना दिसते, परंतु – राज्याच्या समुद्र किनाऱ्यावर ती अतिसंवेदनशील दिसते?
a. केरळ**
b. तामिळनाडू
c. ओरिसा
d. कर्नाटक
13.महाराष्ट्राचे पठार मुख्यत्वेकरून खालीलपैकी कोणत्या खडकांपासून निर्माण झाले आहे?
a. धारवाड
b. कडप्पा
c. असिताष्म**
d. कृष्णप्रस्तर
14.महाराष्ट्रातील कोणत्या भागात बेसॉल्ट खडकाची जाडी सर्वांत जास्त आहे ?
a. दक्षिण
b. पश्चिम**
c. मध्य
d. उत्तर
15. पुणे जिल्ह्याच्या दक्षिण सीमेवरून
कोणती नदी वाहते?
a. इंद्रायणी
b. भीमा
c. नीरा**
d. अंबी
16.खालीपैकी कर्कवृत्ताला दोन वेळा ओलांडणारी नदी कोणती.
a. महानदी
b. नर्मदा
c. मही**
d. चंबळ
17.खालीलपैकी कोणत्या राज्यांमध्ये एकापेक्षा
जास्त नॅशनल पार्क आहेत?
a. उत्तर प्रदेश
b. मनिपुर
c. नागालँड
d. त्रिपुरा**
18.खीरगंगा नेशनल पार्क कोणत्या राज्यात
आहे?
a. आसाम
b. वेस्ट बंगाल
c. उत्तराखंड
d. हिमाचल प्रदेश **
19. घोडाझरी प्रकल्प कोणत्या जिल्ह्यातील आहे?
a. भंडारा
b. गोंदिया
c. चंद्रपूर**
d. नागपूर
20. गोसिखुर्द धरण कोणत्या जिल्ह्यात आहे?
a. भंडारा**
b. गोंदिया
c. चंद्रपूर
d. नाशिक
21.देशात सर्वाधिक दलदलीय क्षेत्र कोणत्या
राज्यात आहेत?
a. महाराष्ट्र
b. गुजरात**
c. पश्चिम बंगाल
d. आंध्र प्रदेश
22.पश्चिम घाटाच्या पश्चिम उतारावर कोणत्या प्रकारची जंगले आढळतात?
1. पावसाळा
2. उष्णकटिबंधीय सदाहरित**
3. सवाना
4. अल्पाइन
23.डॉ. बी. आर. आंबेडकर यांनी मंदिर प्रवेशाची चळवळ कोणत्या वर्षी सुरू केली ?
a. 1919
b. 1927**
c. 1931
d. 1923
24. सातवाहन वंशाचे संस्थापक खालीलपैकी कोण होते ?
a. सातकर्णी – पहिले
b. कान्हा
c. शिवस्वती
d. सिमुक**
सिमुक :
✅हा सातवहन राजवंशाचा संस्थापक होय.
✅राजा सिमुकने शेवटचा कण्व राजा सुशर्मा याला ठार केले आणि आपली सत्ता प्रस्थापित केली.
✅याने विदर्भ आणि विदिशा (मध्यप्रदेश मधील काही भाग) जिंकून घेतले व स्वतःला दक्षिणपथपती असे बिरुद धारण करुन घेतले.
25. बुचेरेरिया बँक्रोक्टी हे साठी कारणीभूत ठरतात.
a. अमिबाजन्य विकार
b. हत्तीरोग (फिलेरियासिस)**
c. डेंगू ज्वर
d. शीतज्वर
हत्ती रोग :
✅ हत्तीरोगाचा प्रसार सुतासारखा दिसणाऱ्या परोपजीवी कृमीमुळे होतो.
✅ भारतामध्ये 98 टक्के रुग्णांमध्ये हत्तीरोगाचा प्रसार
वुचेरेरिया बँक्रोक्टी या परोपजीवी कृमींमुळे झालेला
आढळून येतो.
✅हा रोग क्युलेक्स विचकी फॅसिएटस नावाच्या अळ्यांमुळे होतो. या अळ्या डासांच्या चाव्यांद्वारे पसरतात.
✅ 5 ऑगस्ट : हत्तीरोग दिन
✅महाराष्ट्रात वर्धा येथे हत्तीरोग संशोधन केंद्र आहे.
26. खालीलपैकी कोणत्या मराठी संताने ‘भावार्थ-दीपिका’
लिहिली ?
a. संत तुकाराम
b. संत एकनाथ
c. संत नामदेव
d. संत ज्ञानेश्वर**
✅भावार्थ दिपिका हा ग्रंथ संत ज्ञानेश्वरांनी लिहिला आहे.
✅इ.स. 1290 साली प्रवरा नदीच्या तिरावरील नेवासे या गावातील मंदिरात एका खांबाला टेकून भगवत् गीतेवरील ज्ञानेश्वरांनी जे भाष्य केले त्यालाच ज्ञानेश्वरी किंवा भावार्थ दिपीका म्हटले जाते.
✅ यामध्ये एकूण 18 अध्याय आहेत.
✅संत ज्ञानेश्वरांचे इतर ग्रंथ – अमृतानुभव, चांगदेव पासष्टी, हरिपाठ.
27. महाराष्ट्र राज्यातील जिल्हा परिषदांची एकूण संख्या.
a.28
b.34**
c.36
d.39
महाराष्ट्र
-ग्रामपंचायत : 27,832
-पंचायत समित्या : 351
-जिल्हा परिषदा : 34
-नगरपंचायती : 128
-नगरपरीषदा : 241
-महानगरपालिका : 28 (29 वी जालना)
28.भारत सरकारचे, आदिवासी कल्याण मंत्रालय
मध्ये स्थापन करण्यात आले.
a. 1999**
b. 1995
c. 1998
d. 1996
✅आदिवासी कल्याण मंत्रालय, भारत सरकार यांची
स्थापना 1999 मध्ये करण्यात आली आहे.
✅तसेच 89 व्या घटनादुरुस्ती कायदा, 2003 अनुसार
राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाची स्थापना
करण्यात आली आहे. (कलम -338 क)
29.खालीलपैकी पश्चिमेकडे प्रवाहित होणारी नदी कोणती आहे ?
a. कृष्णा
b. गोदावरी
c. महानदी
d. तापी**
महाराष्ट्र नदीप्रणाली
✅पूर्व वाहिनी नद्या : कृष्णा, भीमा, गोदावरी, वैनगंगा, पैनगंगा
✅पश्चिम वाहिनी : पूर्णा, नर्मदा, तापी, दमणगंगा, सावित्री,वैतरणा, उल्हास, कुंडलीका (कोकणातील सर्व नद्या)
✅उत्तर वाहिनी : वाघुर, मोरणा, नळगंगा, पांझरा
✅दक्षिण वाहिनी : इंद्रावती, वेण्णा, वैनगंगा, प्राणहीता, वर्धा, पेंच
30.महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात फणसाड वन्यजीव अभयारण्य आहे ?
a. रत्नागिरी
b. बीड
c. हिंगोली
d. रायगड**
फणसाड वन्यजीव अभयारण्य
✅ठिकाण : रायगड जिल्ह्यातील मुरुड व रोहा तालुक्यात
✅स्थापना : 25 फेब्रुवारी 1986
✅क्षेत्रफळ : 69.79 चौ.कि.मी.
✅कातकरी जमात : रायगड
✅वनक्षेत्र : मुरुड जंजीऱ्याच्या राजाने शिकारीसाठी संरक्षित केले होते.
32.एशियाटिक सोसायटी ऑफ बंगाल (Asiatic Society of Bengal) ची स्थापना कोणत्या वर्षी झाली ?
a. 1804
b. 1784**
c. 1823
d. 1796
एशियाटिक सोसायटी ऑफ बंगाल
✅स्थापना : 15 जानेवारी, 1784
✅संस्थापक : विल्यम जोन्स
✅ठिकाण : फोर्ट विल्यम, कोलकाता
✅उद्देश : प्राचीन काळातील इतिहास आणि
संस्कृतीचा अभ्यास करणे.
33. नाणेघाटास, या राजवंशाच्या काळात नाणेघाट किंवा नाना घाट असेही म्हटले जात असे.
a. चालुक्य
b. राष्ट्रकुट
c. वाकाटक
d. सातवाहन**
34. खालीलपैकी कोणते प्रतिस्थापन पातळी जननक्षमता म्हणून गणले जाते ?
a. प्रति स्त्री 2.0 मुले (children)
b. प्रति स्त्री 2.4 मुले ( children)
c. प्रति स्त्री 2.1 मुले (children)**
d. प्रति स्त्री 2.3 मुले (children)
35. ही द्वीपकल्पीय भारतातील दुसरी सर्वांत मोठी पश्चिमवाहिनी नदी आहे.
a. गोदावरी
b. नर्मदा
c. कृष्णा
d. तापी**
36.’न्यू डायमेंशन्स ऑफ इंडियाज फॉरेन पॉलिसी’ या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत?
a. ए. पी. जे. अब्दुल कलाम
b. पी. व्ही. नरसिंह राव
c. अटलबिहारी वाजपेयी **
d. शशी थरूर
✅अटल बिहारी वायपेयी जन्म दिन 25 डिसेंबर, सुशासन दिन म्हणून साजरा केला जातो.
✅न्यू डायमेंशन्स ऑफ इंडियाज फॉरेन पॉलीसी या पुस्तकाचे लेखक माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आहेत.
✅16 ऑगस्ट, 2018 मध्ये दिल्ली येथे त्यांचे निधन झाले.
37.प्रक्रियेद्वारे एक जीव त्याच्या अंतर्गत वातावरणाचे संतुलन राखण्याचा प्रयत्न करतो.
a. रक्तस्तंभन (Hemostasis)
b. अभिभावितता (Hypostasis)
c. विक्षेप (Metastasis)
d. समस्थिती (Homeostasis )**
✅ समस्थिती : ही भौतिक तसेच रासायनिक स्थिती असून ही शरीराच्या अंतर्गत भागात कार्यरत असते.
✅ शरीराचे तापमान आणि द्रव्य संतूलन ठेवण्याचे प्रमुख काम करते.
38. पश्चिम वाहिनी नद्यांच्या खोऱ्यांनी (West Flowing River Basin, WFRB) महाराष्ट्राच्या भौगोलिक क्षेत्रापैकी टक्के क्षेत्र व्यापले आहे.
a. 6.83
b. 24.45
c. 18.25
d. 10.73**
महाराष्ट्र नदीखोरे
गोदावरी नदीखोरे : 49.5%
भीमा-कृष्णा नदीखोरे : 22.6%
तापी पुर्णा नदीखोरे : 16.7%
कोकणातील पश्चिमवाहिनी नद्या : 10.73%
39. धम्मपदा (Dhammapada) मध्ये किती अध्याय आहेत ?
a.26**
b.21
c. 18
d.32
40. कर्नाटकी गायक आणि संगीतकार मंगलमपल्ली बाल मुरलीकृष्ण (Mangalampalli Balamuralikrishna) हे त्यांच्या कोणत्या वादनासाठी प्रसिद्ध होते ?
a. तबला (Tabla)
b. सितार (Sitar)
c. दिलरुबा (Esraj)
d. व्हायोलिन (Violin)**
41. मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूशन नेटवर्क (MFIN) ची
स्थापना कोणत्या वर्षी झाली होती ?
a. 2006
b. 2003
c. 2000
d.2009**
42. महाराष्ट्राच्या 2020-21 च्या आर्थिक पाहणीनुसार, वर्ष 2018-19 मध्ये निव्वळ पेरणी क्षेत्र राज्याच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या……. टक्के होते.
a. 17
b. 62
c. 55**
d. 42
43.जगातील प्राण्यांच्या एकूण प्रजातींपैकी…….अधिक प्रजाती भारतात आहेत.
a.7.5 टक्क्यांहून**
b. 4.5 टक्क्यांहून
c. 12.5 टक्क्यांहून
d. 10.0 टक्क्यांहून
44) ज्वालामुखीच्या बेसॉल्टिक लाव्ह्याच्या विघटनाने
खालीलपैकी कोणती मृदा तयार होते?
a. काळी मृदा (Black soils)**
b. डोंगराची मृदा (Mountain soils)
c. जांभ्या खडकाची मृदा (Laterite soils)
d. गाळयुक्त मृदा (Alluvial soils)
45.7 ऑगस्ट 1942 रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन मुंबईत गोवालिया टँक (क्रांती मैदान) येथे आयोजित केले होते. खालीलपैकी कोण या अधिवेशनाचे अध्यक्ष होते ?
a. राजेंद्र प्रसाद
b. सुभाषचंद्र बोस
c. मौलाना अबुल कलाम आझाद**
d. जे. बी. कृपलानी
46. हाजी अली दर्गा (Haji Ali Dargah)येथे आहे.
a. नाशिक
b. रत्नागिरी
c. पुणे
d. मुंबई**
47. मुघल साम्राज्याचा संस्थापक बाबर याचा मृत्यू केव्हा झाला.
a. 1530**
b.1531
c. 1528
d.1529
बाबर
✅मुघल सत्तेचा संस्थापक.
✅1526 मध्ये दिल्ली येथील सुलतानशाही संपुष्ठात आली आणि तेथे मुघल सत्तेची स्थापना झाली.
✅इब्राहीम लोदी आणि बाबर यांच्यामध्ये 1526 ला पानीपत येथे युद्ध झाले होते, हेच ते पहिले पानीपत युद्ध होय.
✅ इ. स. 1530 मध्ये बाबरचा मृत्यु झाला.
48.खालीलपैकी कोणती पूर्वांचलची एक पर्वतरांग नाही ?
a. मिश्मी (Mishmi)
b. नागा (Naga)
c. पटकाई बुम (Patkai Bum)
d. झास्कर (Zaskar)**
49.महाराष्ट्राच्या 2020-21 च्या आर्थिक पाहणीनुसार, महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील किती टक्के लोकसंख्या दारिद्रयरेषेखाली आहे ?
a. 24.2**
b. 20.2
c. 18.6
d. 28.3
✅ महाराष्ट्राच्या 2020-21 च्या आर्थिक पाहणीनुसार महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील दारिद्रयरेषेखालील लोकसंख्या प्रमाण 24.2% इतके आहे.
50.बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेंतर्गत…….हेक्टरपर्यंत जमीन धारण करणाऱ्या आणि 1.50 लाख रुपयांपर्यंत
वार्षिक उत्पन्न असलेल्या एसटी शेतकऱ्यांना 100 टक्के अनुदानाच्या स्वरूपात आर्थिक सहाय्य दिले जाते.
a. 6
b. 5
c. 4
d. 3
✅बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत 6 हेक्टरपर्यंत जमीन धारण करणाऱ्यास दिड लाख वार्षिक उत्पन्न असणाऱ्या शेतकऱ्यास अर्थसहाय्य केले जाते.
51)खालीलपैकी कोणता राजकीय पक्ष राष्ट्रीय पक्ष नाही ?
a. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
b. आम आदमी पार्टी**
c. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
d. तृणमूल काँग्रेस
✅9 फेब्रुवारी, 2022 या दिवशी पेपर झाला होता तेव्हा आम आदमी पार्टी हा राष्ट्रीय पक्ष नव्हता, पण 10 एप्रिल, 2023 रोजी केंद्रिय निवडणूक आयोगाने आम आदमी पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा बहाल केला, तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, तृणमूल काँग्रेस आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया या तीन पक्षांचा राष्ट्रीय दर्जा काढून घेतला.
52)…………..मध्ये, हॅन (Hahn) आणि मिटनर यांनी युरेनियमच्या न्यूट्रॉन-प्रेरित विखंडनाची घटना शोधून काढली, जी अणुऊर्जा अणुभट्ट्या आणि अण्वस्त्रांसाठी आधार म्हणून काम करेल.
a. 1901
b. 1899
c. 1938**
d. 1838
✅1938 मध्ये हॅन (Hahn) आणि मिटनर यांनी
युरेनियमच्या न्यूट्रॉन-प्रेरित विखंडनाची घटना
शोधून काढली, जी अणुऊर्जा अणुभट्ट्या आणि
अण्वस्त्रांसाठी आधार म्हणून काम करेल.
53. खालीलपैकी कोणता शास्त्रीय नृत्य प्रकार संत आणि सुधारक महापुरुष शंकरदेव यांनी प्रस्तुत केला आहे ?
a. कथ्थक
b. भरतनाट्यम
c. ओडिशी
d. सत्तरीय**
54. राजीव गांधी प्राणी उद्यान (Rajiv Gandhi Zoological Park) महाराष्ट्रातील. ………. जिल्ह्यात आहे.
a. औरंगाबाद
b. पुणे**
c. नाशिक
d. हिंगोली
✅राजीव गांधी प्राणी संग्रहालय उद्यान (कात्रज) महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात आहे.
✅सत्तरीय हा शास्त्रीय नृत्य प्रकार संत आणि सुधार महापुरुष शंकरदेव यांनी प्रस्तुत केला आहे.
55. नोव्हेंबर 2019 मध्ये श्री. उद्धव ठाकरे
महाराष्ट्राचे…………….मुख्यमंत्री झाले.
a. 17
b. 18
c. 19**
d. 16
56.खालीलपैकी कोणी ‘मूकनायक’ (Muknayak) हे वर्तमानपत्र सुरू केले ?
a. डॉ. बाबासाहेब आंबेडकर**
b. महात्मा ज्योतिराव फुले
c. नारायण गुरू
d. बाळ गंगाधर टिळक
मुकनायक वृत्तपत्र
✅सुरुवात : 31 जानेवारी 1920
✅प्रकार : पाक्षिक
✅संपादक : डॉ. बाबासाहेब आंबेडकर
✅बंद : 1923
✅शीर्षभागी : संत तुकारामाची वचने
✅आर्थिक मदत : छ. शाहू महाराज
57.भारतामध्ये, जर एखाद्या गावाची लोकसंख्या
असेल, तर अशी एकापेक्षा अधिक गावे एका ग्रामपंचायती पेक्षा कमी अंतर्गत येतात.
a. 500**
b.250
c.750
d. 1000
✅भारतामध्ये जर एखाद्या गावाची लोकसंख्यापेक्षा 500 पेक्षा कमी असेल, तर अशा एकापेक्षा अधिक गावे एका ग्रामपंचायती अंतर्गत येतात.
✅ अशा छोट्या खेड्यांचे मिळुन बनलेल्या ग्रामपंचायतीला ग्रुप ग्रामपंचायत किंवा गट ग्रामपंचायत असे म्हणतात.
59.भारतीय राज्यघटनेने खालीलपैकी कोणत्या देशाकडून राज्य धोरणांचे निर्देशात्मक तत्त्व (Principle of State Policies) घे आहे ?
a. संयुक्त राज्य (USA)
b. फ्रान्स
c. रशिया
d. आयर्लंड**
60.पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथील…….लेण्यांमध्ये
सातवाहन (Satavahana) राजवंशातील महत्त्वाच्या व्यक्तींची नावे कोरली आहेत ?
a. नाणेघाट**
b. कार्ले
c. बेडसे
d. चैत्य
61.खालीलपैकी कोणत्या पर्वताला महाराष्ट्राचा एव्हरेस्ट म्हणून ओळखले जाते ?
a. साल्हेर
b. कळसूबाई**
c. अंजनेरी
d. गवळदेव
कळसुबाई पर्वत
-ठिकाण : अकोले तालुका अहमदनगर
-उंची : 1646 मीटर (5400 फुट)
– सह्याद्री पर्वतातील (महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर
– अभयारण्य : कळसुबाई – हरिश्चंद्रगड वन्यजीव
62. खालीलपैकी कोणत्या भारतीय राज्यात निव्वळ पेरणी क्षेत्र हे राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी आहे?
a. हरियाणा
b. उत्तर प्रदेश
c. हिमाचल प्रदेश**
d. पश्चिम बंगाल
✅हिमाचल प्रदेशच्या 80 टक्के पेक्षा अधिक भाग
वनांनी अच्छादलेले आहे. त्यामुळे तेथे पेरणी क्षेत्र
राष्ट्रीय सरासरीपेक्षा खुपच कमी आहे.
63. वि. दा. सावरकर यांनी बांधलेले ‘पतित पावन मंदिर’ हे महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहेत.
a. नागपूर
b. रत्नागिरी**
c. पुणे
d. नाशिक
✅पतित पावन हे मंदीर रत्नागिरी येथे असुन त्याची हे स्थापना 22 फेब्रुवारी, 1931 रोजी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी केली होती.
64.31 मार्च 2020 पर्यंतच्या माहितीनुसार, महाराष्ट्रात आंतरराष्ट्रीय विमानतळ आहेत.
a.8
b.9
c.7
d.5**
महाराष्ट्रातील आंतरराष्ट्रीय विमानतळे :
✅आंतरराष्ट्रीय विमानतळे 3 आहेत, पण TCS ने 5 हे उत्तर दिले आहे.
1. छ. शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (मुंबई)
2. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ (नागपुर)
3. पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ
✅ इतर विमानतळे : नवी मुंबई, कोल्हापुर, सोलापुर,ओझर, नांदेड, कराड, अहमदनगर, अमरावती इ.
65.औद्योगिक धोरण ठराव 1956 मध्ये कशावर भर देण्यात आला ?
a. सार्वजनिक क्षेत्रात अवजड उद्योगांची स्थापना**
b. डिजिटल आणि यांत्रिक उद्योगांची स्थापना
c. लघुभार उद्योग स्थापना
d. कृषी-केंद्रित उद्योग स्थापना
66.’द इंडियन वॉर ऑफ इन्डिपेन्डन्स 1857′ या पुस्तकाचे
लेखक खालीलपैकी कोण आहेत ?
a. महादेव रानडे
b. वासुदेव बळवंत फडके
c. श्यामजी कृष्ण वर्मा
d. स्वातंत्र्यवीर व्ही. डी. सावरकर**
✅ द इंडियन वॉर ऑफ इन्डीपेंन्डस (1857 चे
स्वातंत्र्यसमर) क्रांतीकारी पुस्तकाचे लेखक स्वातंत्र्यवीर
सावरकर हे आहेत.
67.खालीलपैकी कोणती रांग पूर्वांचल प्रदेशातील नाही ?
a. मणिपूर टेकड्या
b. पटकाई टेकड्या
c. नागा टेकड्या
d. पीर पंजाल रांग**
68. चौसाच्या लढाईत शेर शाह सुरीने हुमायूनचा पराभव
कोणत्या वर्षी केला ?
a. 1530
b. 1535
c. 1532
d. 1539**
✅चौसाची लढाई : हा मुघल सम्राट हुमायुन आणि
अफगाण सरदार शेरशाह सुरी यांच्यात 26 जुन
1539 रोजी बिहार राज्यातील बक्सार जवळ चौसा
या ठिकाणी झाली होती.
✅या युद्धात शेरशाह सुरी याचा विजय झाला होता.
69. लोसर हे खालीलपैकी कोणाद्वारे नवीन वर्ष म्हणून साजरे केले जाते ?
a. भिल्ल समाज
b. तिबेटीयन बौद्ध**
c. श्रीलंकेमधील बौद्ध
d. जैन
✅ तिबीटीयन बौद्ध लोकांचे नवीन वर्ष हे लोसरद्वारे दर्शवतात.
70. स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर-जनरल कोण होते ?
a. मौलाना आझाद
b. खान अब्दुल गफार खान
c. चक्रवर्ती राजगोपालाचारी**
d. डॉ. राजेंद्र प्रसाद
व्हाईसरॉय कार्यकाळ
1. लॉर्ड आयर्विन – 1926 – 1931
2. लॉर्ड विलिंग्डन – 1931 – 1936
3. लॉर्ड लिनलिथगो – 1936 – 1944
4. लॉर्ड वेव्हेल – 1944 – 1947
5. लॉर्ड माऊंटबॅटन – 1947 – 1948
6. सी. राजगोपालचारी- जुन 1948 ते 26 जानेवारी
1950
71.दलित चळवळीचे प्रभावशाली व्यक्ती खालीलपैकी कोण होते ?
a. लाल बहादूर शास्त्री मराठी
b. महात्मा गांधी
c. पंडित नेहरू
d. डॉ बाबासाहेब आंबेडकर**
72.अरवली या प्राचीन पर्वतातील सर्वोच्च शिखर कोणते ?
a. दोडा बेटा
b. बैराट
c. गुरुशिखर**
d. एव्हरेस्ट
73. 2011 च्या राज्य व सर्व क्षण अहवालानुसार
भारतातील वनाचे क्षेत्रफळाचे प्रमाण किती आहे ?
a. 10.30 %
b. 15.30%
c. 21.05%**
d. 31.05%
74. भारतातील सर्वात उंच वरील रेल्वे स्टेशन खालीलपैकी
कोणते आहे ?
a. सिमला
b. श्रीनगर
c. लेह
d. धूम (दार्जिलिंग )**
75.भारतीय हवामानावर प्रभाव टाकणारा प्रवाह कोणत्या महासागरातून वाहतो ?
a. अटलांटिक
b. हिंदी
c. आर्टिक
d. पॅसिफिक**
76.पंतप्रधान मोदींनी कोणत्या राज्यात वन्यजीव अनुकूल महामार्ग प्रकल्पांचे उद्घाटन केले ?
a. मध्य प्रदेश
b. तामिळनाडू
c. छत्तीसगड**
d. आसाम
77. सह्याद्री पर्वताची उंची सरासरी किती आहे ?
a.1300 मी
b.1200 मी**
c.1500 मी
d.1400 मी
78. लेट मी से इट नाऊ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
a. राकेश मारिया**
b. दत्ता पडसलगिरकर मराठी
c. जुलीओ रीबेरो
d. सुबोध जायसवाल
79. खालीलपैकी कोणता दिवस जागतिक लोकसंख्या दिवस म्हणून साजरा करतात ?
a. 11 जुलै**
b. 11 ऑगस्ट
c. 11 सप्टेंबर
d. 11 ऑक्टोंबर
80. भारतीय संविधानामध्ये स्वातंत्र्याचा हक्क हे कोणत्या कलमानुसार आहे ?
a. कलम 23 ते 24
b. कलम 25 ते 28
c. कलम 19 ते 22**
d. कलम 29 ते 30
81. ” फॉक्सकॉन ” ही कंपनी कोणत्या देशाची
कंपनी आहे ?
a. चीन
b. जपान
c. रशिया
d. तैवान**
82.भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणता आहे ?
a) सांभर
b) दाल
c) चिल्का**
c) यापैकी नाही
83.” मलायगिरी “हे शिखर खालीलपैकी कोणत्या
राज्यामध्ये आहे ?
a) नागालँड
b) उडीसा**
c) पंजाब
d) हरियाणा
84. कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी कशाचा वापर केला जातो ?
a) सोडियम नायट्रेट
b) सोडियम क्लोराइड
c) सिल्वर आयोडाइड**
d) यापैकी नाही
85.कोणाच्या काळामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली ?
a) लॉर्ड कर्झन
b) लॉर्ड मेयो
c) लॉर्ड डफरीन**
d) लॉर्ड विल्यम हेनरी
86. “दाभोसा ” हा धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे ?
a. ठाणे
b. पालघर**
c. रत्नागिरी
d. सिंधुदुर्ग
87. ” सेवा सदन ” ही संस्था खालीलपैकी कोणी
स्थापन केली आहे?
a. पंडिता रमाबाई
b. रमाबाई रानडे**
c. ताराबाई शिंदे
d. यापैकी नाही
88. PWG हे खालीलपैकी कशा संबंधित आहे ?
a. आरोग्य
b. शिक्षण
c. नक्षलवाद**
d. यापैकी नाही
89.” अनेर” हे धरण खालीलपैकी कोणत्या
जिल्ह्यामध्ये आहे ?
a) गोंदिया
b) चंद्रपूर
c) धुळे**
d) नंदुरबार
90.2011 जनगणानुसार भारताच्या आदिवासी
लोकसंख्येची टक्केवारी किती होती ?
a) 5.7
b) 8.6**
c) 7.9
d) 7.1
91. शोषणाविरुद्धचा अधिकार यांच्या विषयी कलम
कोणता आहे ?
a) कलम 20, 21
b) कलम 21, 22
c) कलम 23, 24**
d) कलम 25, 26
Read More
Super question